चिंचवडमध्ये झालेल्या स्पर्धेत रावी कदमने ९ वर्षांखालील मुलींच्या एकेरीचे आणि चैत्रा डोनेसोबत ११ वर्षांखालील मुलींच्या दुहेरीचे जेतेपद पटकावले. एकेरीत रावीने हर्षली भावेचा १५–४, १५–३ असा पराभव केला. दुहेरीच्या अंतिम लढतीत रावी–चैत्रा यांनी गुंजन घाडगे–प्रसन्ना दुखंडे यांच्यावर १५–९, १५–१० असा मात केली.
रावीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक होत असून तिच्या यशामध्ये आई-वडिलांचे पाठबळ मोलाचे ठरल्याचे विशेषत्वाने नमूद केले जात आहे. त्यांच्या प्रोत्साहनामुळे आणि मार्गदर्शनामुळे रावीने दुहेरी मुकुट पटकावण्याचा पराक्रम साधला आहे.
रावी कदम ही अत्यंत मेहनती, खेळाची आवड असलेली आणि शिक्षणातही तितकीच हुशार, बहुगुणी विद्यार्थिनी म्हणून ओळखली जाते. तिच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे व जिद्दीमुळेच तिने खेळात असे उल्लेखनीय यश मिळवले आहे. तिला तिची आई रोहिणी कदम व वडील संदीप कदम यांचे मार्गदर्शन मिळाले.

टिप्पणी पोस्ट करा