Ahilyanagar : विधानपरिषद अध्यक्ष प्रा. शिंदे यांच्याकडे कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी केली ही मागणी...

 
विक्रम बनकर, अहिल्यानगर : कर्मचारी कायम शासन सेवेत समावेशन व्हावे,आरोग्य विमा लागू व्हावा,वेतनवाढ व्हावी,समान काम- समान वेतन व्हावे, अशा विविध मागण्यांच्या अनुषंगाने राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी विधान परिषद अध्यक्ष प्रा.राम शिंदे यांना बेमुदत संप कामबंद आंदोलनाबाबत निवेदन दिले आहे. प्रा. शिंदे यांनी तत्काळ या निवेदनाची दखल घेत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना प्रत्यक्ष भेटून व फोनद्वारे याबाबत चर्चा करू, तसेच आरोग्य विभागाचे सचिव, आयुक्त यांच्याशी बैठक घेऊन याबाबत पाठपुरावा करु,असे आश्वासन दिले आहे.

जिल्ह्यात कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेले आंदोलन सोळाव्या दिवशीही त्याच जोमाने सुरू आहे. या आंदोलनाला राज्यभरातून मिळणारा वाढता पाठिंबा आंदोलनकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवत आहे. महाराष्ट्रासह अहिल्यानगर जिल्ह्यात कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या या लढ्यात शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी,अशी कंत्राटी कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे. या अनुषंगाने संघटनेच्या वतीने प्रा.शिंदे यांची भेट घेण्यात आली.

अहिल्यानगर आरोग्य सेवा कर्मचारी आंदोलन टीमचे समन्वयक विजय गायकवाड,गोरक्ष काळे,सतिष आहिरे,संजय पालवे, आशीष ईरमल,गोरक्ष इंगोले,डॉ.हर्षल पठारे,सुषमा पोळ,प्रीती धाडगे,शुभदा टेपाळे,शिल्पा लंके आदी यावेळी उपस्थित होते. आंदोलकांच्या सोयी-सुविधा, संघटनात्मक एकजूट आणि नियोजन या सर्व बाबींची जबाबदारी ही टीम समर्थपणे पार पाडत आहे.कंत्राटी आरोग्य कर्मचारी शासनापर्यंत आपली व्यथा पोचवण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने