शिबिरात कर्मचाऱ्यांची प्राथमिक तपासणी करून कर्मचाऱ्यांना नियमित व्यायाम, योग्य आसनपद्धती, सकस आहार व सक्रिय जीवनशैली अंगीकारण्याचे आवाहन करण्यात आले. फिजिओथेरपिस्टांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे सोपे व्यायाम, स्ट्रेचिंग तंत्रे, ऑफिसमध्येच करता येतील असे लहानसे व्यायाम दाखवले. शिबिरात सहभागी कर्मचारी व अधिकाऱ्यांनी वैयक्तिक समस्यांवर तज्ज्ञांचा सल्ला घेतला. काही कर्मचाऱ्यांनी या निमित्ताने आपली शरीरस्थिती तपासून घेऊन पुढील उपचार व काळजी याबाबत मार्गदर्शन घेतले. या शिबिरामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांना केवळ आजारपणावर उपायच नव्हे तर भविष्यात उद्भवणाऱ्या शारीरिक समस्यांना प्रतिबंध घालण्याबाबतही जागरूकता निर्माण झाली.
आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे म्हणाले की, जागतिक फिजिओथेरपी दिन दरवर्षी ८ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी फिजिओथेरपीच्या महत्त्वाची जनजागृती केली जाते. नागरिकांना औषधाविना उपचाराच्या या शास्त्राचे फायदे समजावले जातात. महानगरपालिकेने घेतलेले हे शिबिर केवळ कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या आरोग्यविषयक फायद्यासाठीच नव्हे तर कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठीही महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी व्यक्त केला.
टिप्पणी पोस्ट करा