
ब्युरो टीम : हिंदू धर्मात पितृ पक्षाला खूपच महत्त्व आहे. या पक्षाची सुरुवात झाली आहे. याकाळात मृत नातेवाईक, पूर्वज पृथ्वीवर परत येतात, अशी धार्मिक मान्यता आहे. तसेच ते केवळ स्वतःच्या कुटुंबाशी जवळीक ठेवत नाहीत, तर त्यासंबंधी काही संकेतही देतात. अध्यात्मिकदृष्ट्या असं मानलं जातं की, स्वप्न हे पूर्वजांशी संपर्क साधण्याचे माध्यम बनू शकते. स्वप्न हे एखाद्या व्यक्तीला इतर जगाशी जोडण्याचं काम करीत असतात. ते मृत नातेवाईकांशी संपर्क स्थापित करण्यात देखील उपयुक्त ठरू शकतात.
खरतर पितृ पक्षाबाबत विविध धार्मिक ग्रंथामध्ये माहिती देण्यात आली आहे. अर्थात यावर कितीपत विश्वास ठेवायचा, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
त्याचप्रमाणे पितृ पक्षाच्या काळात येणाऱ्या स्वप्नांना खूप विशेष महत्त्व असते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्वप्नांबद्दल सांगणार आहोत, जे तुमच्या पूर्वजांच्या संबंधी असतात. अशा स्वप्नांकडे दुर्लक्ष करू नका. कारण अशी मान्यता आहे की, या स्वप्नांच्याद्वारे तुमचे मृत नातेवाईक तुम्हाला संदेश देत असतात.
पितृ पक्षादरम्यान जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांशी संबंधित एखादं स्वप्न पडलं, व त्या स्वप्नात ते तुम्हाला प्रसन्न दिसले, तर तुमचे पूर्वज तुमच्यावर आनंदी आहेत आणि तुम्हाला आशीर्वाद देत आहेत, असं मानलं जातं. विशेषतः तुमच्या पूर्वजांच्या श्राद्धाच्या दिवशी हे स्वप्न पडले तर ते खूप शुभ असते.
Disclaimer: ही माहिती धार्मिक श्रद्धा आणि परंपरांवर आधारित आहे. याचा उद्देश फक्त माहितीपुरता असून, याला वैज्ञानिक आधार मानू नये. बातमीतील माहितीशी मराठी प्रिंट टीम सहमत असेलच असे नाही.
टिप्पणी पोस्ट करा