विक्रम बनकर, अहिल्यानगर : संगमनेर तालुक्यात उमेदवारांना विविध क्षेत्रांतील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दिनांक ११ सप्टेंबर २०२५ रोजी शिक्षण प्रसारक संस्था, संगमनेर नगरपालिका कला दा.ज. मालपाणी वाणिज्या आणि ब.ना. सारडा विज्ञान (स्वायत्त) महाविद्यालय, संगमनेर येथे पंडित दीनदयाल रोजगार मेळाव्याचे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त रविकुमार पंतम यांनी केले आहे.
एचएससी, सर्व शाखांतील पदवीधर, आयटीआय, डिप्लोमा व डिग्रीधारक उमेदवारांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर तसेच https://forms.gle/CDMcrNKWzDNpAbrL9 या लिंकवर आपली नोंदणी करून पात्रतेनुसार अर्ज करावा.
अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०२४१–२९९५७३५ वर संपर्क साधावा. तसेच रोजगार मेळावा समन्वयक वसीमखान पठाण (९४०९५५५४६५), संतोष वाघ (८८३०२१३९७६), बद्रीनाथ आव्हाड (९४२०७२५२८०) आणि योगेश झांजे (९५८८४०८८९०) यांच्याशीही संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा