Vice President Of India : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन झाले देशाचे नवे उपराष्ट्रपती

 
ब्युरो टीम : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे देशाचे नवे उपराष्ट्रपती झाले आहेत. आज झालेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत राधाकृष्णन यांनी बी. सुदर्शन रेड्डी यांच्यावर विजय मिळवला आहे.

भारताच्या १७ व्या उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी आज मतदान झाले. यात एकूण ९८ टक्के मतदान झाले. यामध्ये एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन आणि इंडिया अलायन्सचे उमेदवार जस्टिस बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत झाली. यामध्ये एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी एकतर्फी विजय मिळवला. या निवडणुकीसाठी  आज सकाळी १० वाजता मतदान सुरू झाले आणि सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालले. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम मतदान केले. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने