सध्या नेपाळमध्ये प्रवास टाळावा. जे नागरिक सध्या नेपाळमध्ये आहेत त्यांनी आपल्या निवासस्थानीच सुरक्षित राहावे. अनावश्यकपणे बाहेर पडू नये व स्थानिक प्रशासनाच्या तसेच भारताच्या दूतावासाच्या सूचनांचे पालन करावे. कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी दूतावासाच्या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावाः
+977-980 860 2881 (व्हॉट्सअॅप कॉलसाठीही उपलब्ध)
+977-981 032 6134 (व्हॉट्सअॅप कॉलसाठीही उपलब्ध)
राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र, नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत आहे. कृपया अधिकृत माध्यमांद्वारेच माहिती प्राप्त करावी व अफवांपासून दूर राहावे, असे आवाहनही राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत करण्यात आले आहे.
राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र
91- 9321587143 (व्हॉट्सअॅप कॉलसाठीही उपलब्ध)
91- 8657112333 (व्हॉट्सअॅप कॉलसाठीही उपलब्ध )

टिप्पणी पोस्ट करा