Ahilyanagar :अहिल्यानगरमधील 'या' शनि मारुती मंदिरात ‘५६ भोग नैवेद्य’ आणि महाप्रसादाचे आयोजन

विक्रम बनकर, अहिल्यानगर : अध्यात्मिक आणि धार्मिक वातावरणात अहिल्यानगर शहरातील माळीवाडा भागातील सुप्रसिद्ध शनि मारुती मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही हनुमान भक्तांसाठी एक विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

माळीवाडा पंचमंडळ देवस्थान ट्रस्टच्या वतीने येत्या रविवारी, दि. २६ ऑक्टोबर रोजी माळीवाडा भागातील प्राचीन शनि मारुती मंदिरात वीर हनुमानाला ५६ प्रकारच्या विविध पदार्थांचा भव्य नैवेद्य (५६ भोग) दाखवण्यात येणार आहे.

देवस्थानचे उपाध्यक्ष पंडित खरपुडे आणि सचिव अशोक कानडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री हनुमानाला ५६ प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवण्याची ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. दरवर्षी दिवाळी संपल्यानंतर येणाऱ्या पंचमीच्या शुभमुहूर्तावर हा विशेष धार्मिक कार्यक्रम साजरा केला जातो. या निमित्ताने मंदिर परिसरात मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती लाभते.

यावर्षीच्या आयोजनात परंपरेनुसार ५६ प्रकारच्या नैवेद्याचे दर्शन घेतल्यानंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. महाप्रसादाच्या माध्यमातून अधिकाधिक भाविकांना या धार्मिक उत्सवाचा भाग होता यावा, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

असा होईल कार्यक्रम

  • सायं. ५.०० ते ७.०० – सामूहिक हनुमान चालिसा वाचन
  • सायं. ७.०० – नित्य पूजा, आरती आणि ५६ भोग नैवेद्य दर्शन
  • त्यानंतर – उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वितरण

या प्रसंगी माळीवाडा पंचमंडळ देवस्थान ट्रस्टच्या वतीने सर्व हनुमान भक्त, नागरिक आणि परिसरातील भाविकांना उपस्थित राहून श्री हनुमानाच्या ५६ नैवेद्य दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पहा व्हिडिओ :


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने