फाळके यांनी राजीनामा दिल्यानंतर काही दिवसातच झालेल्या या भेटीमुळे कर्जत-जामखेडसह संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता व्यक्त होत आहे. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये सौहार्दपूर्ण वातावरणात सुमारे तासभर चर्चा झाली. जिल्ह्यातील राजकीय घडामोडी, संघटनात्मक बदल आणि स्थानिक विषयांवर अनौपचारिक संवाद झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या प्रसंगी कोरेगावचे माजी सरपंच शिवाजी आप्पा फाळके तसेच फाळके परिवारातील सदस्य उपस्थित होते. प्रा. शिंदे यांनी फाळके परिवाराशी संवाद साधत त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. दरम्यान, फाळके यांच्या राजीनाम्यानंतर सभापती शिंदे यांची झालेली ही भेट “औपचारिकतेपलीकडील अर्थ” दर्शवते. या भेटीमुळे जिल्ह्याच्या पुढील राजकीय हालचालींना गती मिळू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. कर्जत-जामखेड परिसरात सध्या या भेटीचीच चर्चा असून, “ही भेट भविष्यातील नव्या समीकरणांची सुरुवात ठरेल का?” असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Ahilyanagar : विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांची राजेंद्र फाळके यांना सदिच्छा भेट; अहिल्यानगरच्या राजकारणात नवा सूर?
विक्रम बनकर, अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकीय पटावर नुकतीच एक महत्त्वाची घटना घडली. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) चे नुकतेच पदत्याग केलेले जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या कर्जत येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. ही भेट पूर्वनियोजित नसल्याची माहिती असून या भेटीने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा