शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने मोठ्या प्रमाणावर स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाची पाहणी आमदार संग्राम जगताप यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून केली. त्यांनी भगतसिंग उद्यान परिसरासह माळीवाडा रस्ता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, सक्कर चौक कॉंक्रिटीकरण रस्ता या ठिकाणांची स्वच्छतेची पाहणी केली मनपाचे आयुक्त यशवंत डांगे यांनी माहिती दिली की, शहरात आता दररोज दोन वेळा स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. सकाळी ६ ते १० आणि दुपारी २ ते ६ या वेळेत. घनकचरा विभागाच्या माध्यमातून रस्त्यावरील कचरा, मातीचे ढिगारे, आणि दुभाजकाजवळ जमा झालेली माती गोळा करून स्वच्छता केली जात आहे.
मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले की, शहरात आता कॉम्पॅक्टर मशीनद्वारे आधुनिक पद्धतीने स्वच्छता सुरू करण्यात आली आहे. यामुळे कचऱ्याचे संकलन आणि व्यवस्थापन अधिक परिणामकारक पद्धतीने होणार आहे. शहर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी नागरिकांनी आपल्या घरातील कचरा वेळेवर घंटागाडीत द्यावा आणि स्वच्छतेत सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या स्वच्छता अभियानामुळे अहिल्यानगर शहरातील स्वच्छतेबाबत एक सकारात्मक पाऊल उचलले गेले असून, नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा