कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या शिरवळ गावात पहिल्यांदाच आयएएस अधिकारी मुक्कामासाठी आलेले ग्रामस्थ भारावून गेले होते. जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख , पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व विभाग प्रमुख यांनी देखील या मोहिमेसाठी गावात मुक्काम करून महास्वच्छती अभियान अंतर्गत श्रमदान करून व्यापक जन चळवळ राबविली.
भल्या पहाटे सिईओ वृक्षारोपनासाठी बांधावर…!
अक्कलकोट तालुक्यात शिरवळ येथे मुक्कामी असलेले सिईओ कुलदीप जंगम भल्या पहाटे उठून बांधावर जाऊन ग्रामस्था समवेत वृक्षारोपण केले. या गावात प्रथमच आयएएस अधिकारी मुक्कामी साठी आलेले ग्रामस्था देखील भारावून गेले होते.
रात्री मुक्कामास आल्यानंतर सिईओ कुलदीप जंगम यांनी भारतीय बैठक मारून ग्रामस्थांशी संवाद साधला. सिईओ यांची घोंगडी बैठकीमुळे ग्रामस्थांनी आपल्या भाव भावना व्यक्त करून गावातील विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. कर्नाटक - महाराष्ट्र च्या सिमेवर असलेले शिरवळ येथील ग्रामस्थांनी कानडी व मराठी राग आळवत भजने गायली. ग्रामस्थां समवेत हरिनामाच्या भजनात सिईओ जंगम तल्लीन झाले होते. उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ यांनी नेटके नियोजन केलेले जिल्ह्यात मोहिम यशस्वी पार पडली.
दुःख विसरून ग्रामस्थांनी केले वृक्षारोपण मोहिम ..!
शिरवळ गावात वृक्षारोपण करीत असताना गावात एका व्यक्तीचे निधन झालेमुळे श्रमदान मोहिम घेता आली नाही मात्र सिईओ समवेत १ हजार वृक्ष लागवड मोहिमेत ग्रामस्थ दुःख विसरून सहभागी झाले होते.
शंभर विभाग प्रमुखांनी केला गावात मुक्काम..!
राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे संकल्पनेतून राबविली जात असलेली मुख्यमंत्री समृध्द पंचायराज अभियान सोलापूर जिल्ह्यात प्रभावी पण राबविणे साठी सिईओ कुलदीप जंगम, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ यांनी शिरवळ येथे मुक्काम केला. तर अतिरिक्त सिईओ संदीप कोहिणकर यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील हागलूर येथे मुक्काम केला. उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी सांगोला तालुक्यातील वाढेगाव येथे मुक्काम केला. ग्रामसभा घेऊन लोकांना अभियानाची माहिती दिली. पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथे मुक्काम करू. भल्या पहाटे महाश्रमदानात सहभाग घेतला. कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज येथे जाऊन मुक्काम केला. तर मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांनी कामती ता मोहोळ येथे जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.ग्रामीण विकास यंत्रणा विभागाचे प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप यांनी कमलापूर येथे मुक्काम केला. तर कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी माचणूर ता. मंगळवेढा, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले पाथरी ता बार्शी, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी कुंभारी ता दक्षिण सोलापूर, कृषी अधिकारी एच एस हावळे टेंभुर्णी ता माढा, शिक्षणाधिकारी कादर शेख ( ब्रम्हपुरी ता मंगळवेढा) , डाॅ. संतोष नवले (यशवंतनगर माळशिरस येथे मुक्काम केला.
महा श्रमदानासाठी सरसावले हजारो हात…!
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत आज जिल्ह्यातील सांकेतिक ग्रामस्थांनी महा श्रमदानात भाग घेतला. शाळेची मुलांच्या प्रभात फेऱ्या काढण्यात आल्या. सर्व गावांत हजारो हात श्रमदाना साठी सरसावले होते. प्लास्टिक विलगीकरणा बरोबर अनेक सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करणेत आली.
टिप्पणी पोस्ट करा