Ahilyanagar : पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत विक्रीकर विभाग व विद्यार्थ्यांकडून मदत


ब्युरो टीम :
राज्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी जिल्ह्यातील विविध संस्था, अधिकारी व विद्यार्थी पुढे सरसावले आहेत. पूरग्रस्तांना दिलासा मिळावा या उद्देशाने वस्तू व सेवा कर विभाग (विक्रीकर) महाराष्ट्र राज्य, अहिल्यानगर येथील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकूण ₹७१,१०१ रकमेचा धनादेश निवासी उपजिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांच्याकडे सुपूर्द केला.

या सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये आर. एन. जाधव, ए. जे. राख, सी. एन. कडेपल्ली, पी. एन. रसाळ, वी. एन. लखायती, के. एम. साळुंके, जी. आर. निमसे, आर. एन. दरोळे व दि. एम. गारगुंड यांचा समावेश आहे. सर्वांनी एकत्रितपणे ही रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अर्पण केली.

दरम्यान, संगमनेर तालुक्यातील प. पु. गगणगिरी महाराज विद्यालय, पिंपरणे येथील विद्यार्थ्यांनी ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमात सहभागी होऊन गावात फिरून ₹१५,३६६ इतकी रक्कम जमा केली. ही रक्कम डिमांड ड्राफ्टच्या स्वरूपात शाळेचे मुख्याध्यापक यांनी निवासी उपजिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांच्याकडे सुपूर्द केली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने