ब्युरो टीम : बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी 1875 मध्ये लिहलेल्या ‘वंदे मातरम’ या गीतास येत्या 7 नोव्हेंबर 2025 रोजी 150 वर्षे पूर्ण होत आहेत. सर्व जनमानसात देशभावना जागृत करण्यात या गीताची महत्वाची भूमिका आहे. या ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्टीने महत्वाच्या घटनेच्या निमित्ताने सार्थ शताब्दी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नाशिक, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची), नाशिक व उच्चस्तर औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नाशिक यांच्या वतीने 7 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता महात्मा नगर क्रिकेट मैदान, एबीबी सर्कल, पारिजात नगर, महात्मानगर, नाशिक येथे ‘वंदे मातरम’ गीताचे सामुहिक गायन आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, अपर आयुक्त यांच्यासह शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन तहसीलदार, नाशिक अमोल निकम व औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नाशिक चे उपसंचालक आर.एस.मुंडासे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा