Ahilyanagar : छत्रपती शिवाजीराजे ग्रामपंचायत अधिकारी सहकारी पतसंस्थेत चेअरमन, व्हाईस चेअरमन व मानद सचिवपदासाठी एकमताने निवड


विक्रम बनकर, अहिल्यानगर :
अहिल्यानगर येथील छत्रपती शिवाजीराजे ग्रामपंचायत अधिकारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी कर्जत येथील प्रताप साबळे, व्हा.चेअरमनपदी पारनेर येथील हरीष भालेराव तर मानद सचिवपदी शेवगाव येथील गोटीराम मडके यांची एकमताने निवड करण्यात आली. ही निवड प्रक्रिया नगर तालुका उपनिबंधक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक महेश पालवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या सभेत एकमताने निवड करण्यात आली.

या निवडीत महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघाचे जिल्हाध्यक्ष किशोरभाऊ जेजुरकर यांच्या नेतृत्वाखालील समविचारी पॅनलने सर्व सत्ता काबीज करत ऐतिहासिक विजय नोंदविला. चेअरमन, व्हा. चेअरमन व मानद सचिव अशी सर्व महत्वाची पदे जिंकत जेजुरकर यांच्या नेतृत्वाला पुन्हा एकदा सर्वांचा एकमुखी पाठिंबा मिळाला. या निवडणुकीत राज्य कोषाध्यक्ष कुंडलिक तात्या भगत यांचीही भूमिका महत्वाची ठरली.

नुतन चेअरमन प्रताप साबळे म्हणाले, संस्थेच्या चेअरमनपदी निवड होणे ही केवळ जबाबदारी नव्हे तर विश्वासाची पावती आहे. संस्थेचा आर्थिक आणि सामाजिक विकास साधण्यासाठी आम्ही एकदिलाने कामकाज करुन किशोरभाऊ जेजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था सहकाराच्या नव्या उंचीवर नेण्याचा आमचा निर्धार आहे.

नुतन व्हा. चेअरमन हरीष भालेराव म्हणाले, संस्थेचा कारभार पारदर्शक व लोकाभिमुख ठेवणे हे आमचे ध्येय असेल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सभासदांना अधिक सुलभ सेवा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.

मानद सचिव गोटीराम मडके यांनी सांगितले, संस्थेच्या प्रगतीसाठी प्रत्येक निर्णय सभासदांच्या हिताचा असेल. किशोरभाऊंच्या सहकार्याने सहकार चळवळीत नवा अध्याय रचण्याचा आमचा मानस आहे.

या निवडीवेळी किशोर जेजुरकर, मा.चेअरमन सदानंद डोखे, मा. व्हाईस चेअरमन श्रीकांत साळे, नवनाथ गोरे, अर्चना गुंड, सुधाकर पगारे, ज्ञानेश्वर सुर्वे, संतोष थिगळे, सुधीर उंडे, संतोष साबळे, प्रशांत सातपुते, ज्ञानदेव अडसुरे, सुरेखा लांडगे, संतोष खंडागळे, संगीता परोडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष तथा संचालक किशोरभाऊ जेजुरकर यांनी पतसंस्थेच्या कार्याचा आढावा सादर केला. यावेळी राज्य कोषाध्यक्ष कुंडलिक भगत, जिल्हा सरचिटणीस पोपटराव रासकर, जिल्हा उपाध्यक्ष उपेंद्र पोटे, युवा नेतृत्व राहुल गांगर्डे, रावसाहेब अभंग, दास तीपोळे, अभिजीत पिंपळे, शिवाजी धांडे,आदी उपस्थित होते. 

पहा व्हिडिओ

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने