राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महापालिकांच्या निवडणुकांचा मार्ग नुकताच मोकळा झाला आहे. प्रभाग रचना आणि इतर मागासवर्गीयांचे आरक्षण यांसारख्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुद्द्यांवरून या निवडणुका रखडल्या होत्या. अखेर आज पहिल्या टप्प्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा होणार आहे, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुका तीन टप्प्यांत घेण्याचे नियोजन केलं आहे. मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका 15 ते 20 जानेवारी 2026 च्या आत पूर्ण करण्याचा आयोगाचा प्रयत्न आहे. नगरपालिका व नगरपंचायतींसाठी नोव्हेंबरमध्ये मतदान होईल, तर जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी डिसेंबरमध्ये मतदान होईल, अशी शक्यता आहे.
निवडणूक होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था पुढीलप्रमाणे:
महापालिका - 29
नगरपंचायती - 246
जिल्हा परिषद - 42
पंचायत समिती - 32
एकूण - 336

टिप्पणी पोस्ट करा