ब्युरो टीम : महाराष्ट्रभरातील मतदारांना ज्या निवडणूक कार्यक्रमाची प्रतीक्षा होती, तो कार्यक्रम अखेर राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. या पत्रकार परिषदेला राज्य निडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे, सचिव सुरेश काकाने, उपसचिव सुर्यकृष्ण मूर्ती, उपायुक्त राजेंद्र पाटील, जनसंपर्क विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ.जगदीश मोरे उपस्थित होते.
राज्य निवडणूक आयोगाने आज जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पहिल्या टप्प्यात राज्यभरात २४६ नगरपरिषद व ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक होणार आहेत. या सर्व नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी येत्या २ डिसेंबर २०२५ ला मतदान होणार आहे. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ३ डिसेंबर २०२५ ला मतमोजणी होणार आहे.
कसा असेल निवडणूक कार्यक्रम?
- अर्ज दाखल करण्यास सुरुवात – १० नोव्हेंबर २०२५
- अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत – १७ नोव्हेंबर २०२५
- अर्जांची छाननी – १८ नोव्हेंबर २०२५
- अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत – २१ नोव्हेंबर २०२५
- आक्षेप असलेल्या ठिकाणी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत – २५ नोव्हेंबर २०२५
- निवडणूक चिन्ह व उमेदवारांची अंतिम यादी – २६ नोव्हेंबर २०२५
- मतदान – २ डिसेंबर २०२५
- मतमोजणी – ३ डिसेंबर २०२५

टिप्पणी पोस्ट करा