Mumbai :सभापतींच्या पुढाकाराने मिरजगावच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली लोकशाहीच्या मंदिराची भेट


विक्रम बनकर, अहिल्यानगर :
लोकशाही मूल्यांची ओळख आणि संसदीय कार्यपद्धतीचे प्रत्यक्ष ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे या उद्देशाने भारत विद्यालय, मिरजगाव (ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) येथील नववी व दहावीतील विद्यार्थ्यांनी आज विधान भवन, मुंबई येथे शैक्षणिक भेट दिली.

ही भेट विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांना विधान सभा आणि विधान परिषदेचे कामकाज तसेच राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वांची माहिती जाणून घेण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांनी संसदीय कार्यप्रणाली, लोकप्रतिनिधींची जबाबदारी आणि लोकशाही निर्णयप्रक्रिया याबाबत सखोल माहिती अत्यंत उत्सुकतेने जाणून घेतली.

या प्रसंगी विद्यार्थ्यांनी सभापती प्रा. राम शिंदे यांची विशेष भेट घेऊन विधायक कार्यपद्धती, लोकशाहीचे कार्य आणि राज्य शासनाच्या विविध योजना याबाबत संवाद साधला. मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांनी सभापती महोदयांचे मनःपूर्वक आभार मानले.

विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करतांना नमूद केले की, "सभापती महोदय हे आमच्या हक्काचा माणूस असल्याने ही विधानभवन भेट शक्य झाली. मुंबईत येऊन विधान भवन पाहण्याची संधी मिळेल असे कधी वाटले नव्हते.”

या भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीविषयी आदर, शासनव्यवस्थेबद्दल जागरूकता आणि सार्वजनिक कार्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी लोकशाही शिक्षणाचा प्रेरणादायी अनुभव ठरला आहे, अशी प्रतिक्रिया शाळेचे मुख्याध्यापक किशोर खुरांगे, शिक्षक राजेंद्र नवले, कल्याण गवारे, श्रीमती निशा गुंड, तसेच शाळेतील विद्यार्थी ज्ञानेश्वरी नवले, रुद्राक्ष लाडाने, साई खुरांगे, संतोषी चव्हाण आदी यांनी व्यक्त केली आहे. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने