Pune : मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा कोथरुडकरांना असाही आधार!

ब्युरो टीम : अपघातात अवयव गमावलेल्या किंवा अनपेक्षित पणे अपंगत्व अलेल्या व्यक्तींना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून आणि भारत विकास परिषद, मिशिलिन, इंडो फ्रेंच चेंबर ॲाफ कॅामर्स, फ्यूप्रो ( टीव्ही शो शार्क टॅंकमध्ये भाग घेणारी आणि उत्कृष्ट स्टार्टअपसाठी भांडवल मिळालेली कंपनी), समुत्कर्ष सोशल फाऊंडेशन आणि तार्क फाऊंडेशनच्या संयुक्त संयोजनातून एक अनोखा उपक्रम हाती घेण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत अपघात किंवा अनपेक्षितपणे अपंगत्व आलेल्या व्यक्तींना कृत्रिम अवयव उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या उपक्रमांतर्गत संविधान दिनाचे औचित्य साधून कोथरुड मधील अशा व्यक्तींची तपासणी करुन त्यांना कृत्रिम अवयव उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. 

एखादा व्यक्ति अपघातात आपला एखादा अवयव गमावतो, तेव्हा त्यांचे संपूर्ण जीवन बदलून जाते. अशा परिस्थितीत व्यक्तीला वाटते की, त्यांचे आयुष्य स्तब्ध झाले आहे आणि ते निराश होऊ शकतात. त्यातच कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे प्रत्येकाला कृत्रिम पाय किंवा हाताची किंमत परवडतेच असे नाही. दिव्यांग आणि अंगविच्छेदनातून गेलेले लोक, ज्यांना त्यांच्या जीवनात साधन, प्रवेश किंवा निधीच्या कमतरतेमुळे पुढे जाण्यास मदत करणाऱ्या गतिशीलता सहाय्य मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतो. 

त्यामुळे अशा गरजूंना पुन्हा आपल्या पायावर उभे करण्यासाठी आवश्यक असलेली संसाधने तसेच सामान्य आणि परिपूर्ण जीवन जगण्याचा आत्मविश्वास देण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतला असून, भारत विकास परिषद, मिशिलिन, इंडो फ्रेंच चेंबर ॲाफ कॅामर्स, फ्यूप्रो ( टीव्ही शो शार्क टॅंकमध्ये भाग घेणारी आणि उत्कृष्ट स्टार्टअपसाठी भांडवल मिळालेली कंपनी), समुत्कर्ष सोशल फाऊंडेशन आणि तार्क फाऊंडेशनच्या संयुक्त संयोजनातून कृत्रिम अवयव जसे की कृत्रिम पाय उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

यासाठी उद्या २६ नोव्हेंबर संविधान दिनाचे औचित्य साधून २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी कोथरुड मधील थरकुडे रुग्णालय येथे सकाळी ०९.३० ते सायं. ०६.०० वेळेत दिव्यांगांची तपासणी करण्यात येणार आहे. तरी कोथरुड मधील गरजूंनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ना. पाटील आणि संयोजकांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने