ब्युरो टीम : माझ्याकरता वैयक्तित एक दमदार आणि दिलदार अशा प्रकारचा मित्र या ठिकाणी सोडून गेलेला आहे, असे मत व्यक्त करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपलं दु:ख व्यक्त केलं आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी ९ च्या सुमारास विमान अपघातामध्ये निधन झाले. बारामती येथे विमान लँड करताना हा अपघात झाला. त्यावेळी अजित दादांचे विमान कोसळले आणि त्याचा स्फोट झाला. या स्फोटामध्ये अजित दादांसह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. दादांच्या अकाली जाण्याने राज्यभर हळहळ व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय सुट्टी आणि तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. फडणवीसांनी यावेळी बोलताना माझा दमदार आणि दिलदार मित्र हरवल्याचं म्हणत आपलं दु:ख व्यक्त केलं आहे.
माझ्याकरता वैयक्तित एक दमदार आणि दिलदार अशा प्रकारचा मित्र या ठिकाणी सोडून गेलेला आहे. एकनाथ शिंदे आम्ही बारामतीकडे निघणार आहोत. पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना घडलेल्या परिस्थितीची माहिती दिली असून त्यांनी प्रचंड दु:ख व्यक्त केलं. राज्यासह देशभरात हळहळ पसरली आहे. पुढील सर्व गोष्ट परिवारासोबत चर्चा करून ठरवण्यात येतील. संपूर्ण पवार कुटुंब बारामतीला पोहोचल्यानंतर त्यांच्या संमतीने घेतली जातील. महाराष्ट्रामध्ये आज शासकीय सुट्टी आणि तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. पुढील सर्व बाबींची कल्पना देण्यात येईल, कधीही भरून निघणार हे नुकसान आहे. लोकनेते गेल्यावर ही पोकळी भरून काढणं कठीण आहे. इतक्या संघर्षाच्या काळात सोबत काम केले आहे. खरंतरं विश्वास ठेवायला मन तयार होत नाहीये, असंही फडणवीस म्हणाले.
सकाळी अतिशय दु:खद घटना घडली आहे. अनाकलनीय परिस्थितीमध्ये विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्याची वार्ता मिळाली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरली. अजित पवार हे लोकनेते होते, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला, महाराष्ट्रांच्या प्रश्नांची जाण असलेला नेता होता. त्यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड आस्था होती, सर्व परिस्थितीमध्ये न डगमगता पुढे जाणारं हे व्यक्तिमत्व होतं. महाराष्ट्राकरता आजचा दिवस कठीण आहे, दादांसारखं नेतृत्त्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात. ज्यावेळी महाराष्ट्राच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण देत होते अशा काळामध्ये त्यांचं निघून जाणे अविश्वसनीय आणि मनाला चटका लावणारं असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
पहा व्हिडिओ
.jpg)
टिप्पणी पोस्ट करा