Delhi : महाराष्ट्र सदनात मराठी संस्कृतीची मेजवानी मनाला सुखद धक्का देणारी– अभिनेते भरत जाधव


ब्युरो टीम : एक कलाकार म्हणून कलेविषयी आणि आपल्या संस्कृतीविषयी बोलताना मिळणारा आनंद हा शब्दांत व्यक्त न करण्याजोगा असतो. महाराष्ट्र सदनात पहिल्यांदाच असा अनुभव घेताना मला मनापासून समाधान वाटत आहे. दिल्लीसारख्या महानगरात, जिथे विविध प्रांतांचे लोक येतात, तिथे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आणि खाद्यसंस्कृतीची चव पोहोचवणे हे अभिमानास्पद कार्य आहे, अशा शब्दांत लोकप्रिय अभिनेते भरत जाधव यांनी दिल्लीतील मराठी उपक्रमाचे कौतुक केले. महाराष्ट्र सदनामध्ये आयोजित  मकर संक्रांती महोत्सव व हुरडा पार्टी चे उद्घाटन भरत जाधव यांच्या हस्ते झाले,  त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला, निवासी आयुक्त गुंतवणूक सुशील गायकवाड, माहिती संचालक हेमराज बागुल सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, स्मिता शेलार, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे उपस्थित होते.

यावेळी जाधव म्हणाले,महाराष्ट्रात हुरडा पार्टीचा आनंद सर्वजण घेतोच, पण परराज्यात आपल्या माणसांसाठी अशी मेजवानी मिळणे ही मोठी पर्वणी आहे. या उपक्रमामुळे दिल्लीतही महाराष्ट्राचा सुगंध दरवळतो आहे.  सर्व दिल्लीकरांनी  या गावरान मेजवानीचा आस्वाद घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने