Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांनी आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ



विक्रम बनकर (ब्युरो टीम) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज  महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत हा शपथविधी पूर्ण झाला.


सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी ‘अजित दादा अमर रहे’ अशा घोषणा दिल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड करण्यात आली . सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवडीचा प्रस्ताव दिलीप वळसे-पाटील यांनी मांडला, तर छगन भुजबळ यांच्याकडून या प्रस्तावाला अनुमोदन देण्यात आले.

पहा व्हिडिओ

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने