ब्युरो टीम : अहिल्यानगर येथील हिंदूयोध्दा प्रतिष्ठानने आयोजित केलेला शिवजयंती सोहळा इस्कॉन मंदिर परिसरात, गुलाबबाबा टावर्स, कादंबरी नगरीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात कादंबरी नगरी व पंचक्रोशीतील शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हिंदूयोध्दा प्रतिष्ठानने आयोजित केलेला सोहळा सायंकाळी ६.३० वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाने साजरा करण्यात आला व तसेच ७.१५ वाजता शिवव्याख्याते गणेश शिंदे यांनी आपले शिवविचार मांडून सर्व शिवभक्तांची मने जिंकली. सर्व शिवभक्तांनी व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नगरसेविका शारदा ढवण, राजेंद्र शेडाळे, महेश कचरे व कादंबरी नगरी पंचक्रोशीतील शिवभक्तांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी महाप्रसाद सुखदेव मल्हारी शेडाळे यांनी दिला. हिंदूयोध्दा प्रतिष्ठानने बालघरमधील सर्व बालगोपाळांना कार्यक्रमास बोलावून त्यांना पाच हजार एक रुपयांची बालघर प्रकल्पासाठी भेट दिली. तसेच कादंबरी नगरीतील शिवजयंतीच्या चौकाचे ‘हिंदूयोध्दा चौक’ असे नामकरण करण्यात आले. यावेळी नगरसेविका शारदा ढवण, राजेंद्र शेडाळे, अनिरुद्ध ढवण व हिंदूयोध्दा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा