ब्युरो टीम : विद्या प्रतिष्ठान महाराष्ट्र संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय आयोजित अहिल्यानगर प्रज्ञाशोध परीक्षा २०२६ चा गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला भारतातील नामवंत शास्त्रज्ञ डॉ.अशोकजी नगरकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्या प्रतिष्ठान नगर केंद्राचे अध्यक्ष दादारामजी ढवाण होते.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हा कौतुक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. जिल्हाभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक या कौतुक सोहळ्यास उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी बोलताना डॉ. नगरकर यांनी विद्यार्थ्यांनी भविष्यात शास्त्रज्ञ होण्यासाठी कसे मार्गक्रमण करावे याचे मार्गदर्शन केले तसेच पालकांनी आपल्या पाल्यांमध्ये विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन कसा जोपासावा, हे सांगितले. दादारामजी ढवाण यांनी प्रज्ञा शोध परीक्षेच्या यशस्वीतेचे कौतुक आपल्या अध्यक्षीय मनोगतातून केले.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अशोकजी नगरकर, विद्या प्रतिष्ठान महाराष्ट्र नगर केंद्राचे अध्यक्ष दादारामजी ढवाण, संस्थेचे कार्यवाह सोमनाथजी दिघे, सहकार्यवाह माजी प्राचार्य डॉ. रवींद्र चोभे, कोषाध्यक्ष माजी प्राचार्य डॉ. रामचंद्र पवार विद्याभारती पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष माजी प्राचार्य अरुणराव कुलकर्णी, हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठानचे सदस्य श्रीकांतजी वैद्य व अंजलीताई वैद्य, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमरनाथ कुमावत आदींच्या हस्ते पारितोषिक वितरण संपन्न झाले.
याप्रसंगी गुरुदेव सेमी इंग्लिश स्कूल सुपा या शाळेचे सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत आल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक मगर यांचा प्रमाणपत्र व गौरव चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तर गुणवत्ता यादीत आलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, गौरव चिन्ह व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रज्ञाशोध विभाग प्रमुख डॉ.अविनाश भांडारकर यांनी केले, तर अहवाल वाचन प्राचार्य डॉ.अमरनाथ कुमावत यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ.दादासाहेब काजळे यांनी करून दिला. गुणवंत विद्यार्थ्यांचे यादी वाचन डॉ. शर्मिला पारधे व डॉ.आश्लेषा भांडारकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. विशाल जाधव यांनी केले. सूत्रसंचालन सोनाली गांगर्डे, साक्षी लोंढे, निकिता मोकाटे व अपर्णा हजारे या विद्यार्थी शिक्षिकांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.गोकुळदास लोखंडे, प्रा.विलास पांढरे,डॉ.प्रदीप शेळके,प्रा.रुपाली ओक, प्रा.सुनील वाकचौरे, प्रा.अनिता लवांडे, प्रा.मनीषा वर्पे, संदीप भोर, प्रमोद राणा,सतीश लवांडे, जयंत मुळे, दिपक आढाव, तेजस रोकडे, दर्शन राहींज आणि बी.एड. प्रथम वर्ष व द्वितीय वर्षाच्या सर्व विद्यार्थी शिक्षक आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा