Mahavir Jayanti 2026 : महावीर जयंतीनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा


ब्युरो टीम: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी महावीर जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. महावीर जयंती, तीर्थंकर भगवान महावीरांचे जीवन कार्य तसेच त्यांच्या अहिंसा, त्याग, क्षमा, जीवदया व अनेकांतवादाच्या शिकवणीचे स्मरण करून देते. त्यांच्या आदर्श विचारांचा प्रभाव आजही भारतीय जनमानसावर दिसून येतो. भगवान महावीरांचे विचार आज सर्वाधिक प्रासंगिक आहेत. महावीर जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने