ब्युरो टीम : बॉलिवूड अभिनेता सनी देओल जेव्हा जेव्हा नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांसमोर येतात, तेव्हा त्या चित्रपटाच्या माध्यमातून ते प्रेक्षकांची मने जिंकतात. याच वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॉर्डर’ या चित्रपटाचा सिक्वेल ‘बॉर्डर 2’ प्रेक्षकांसाठी आणला. 23 जानेवारी रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली असून बॉक्स ऑफिसवरही त्याने चांगली कमाई केली. सिनेमागृहात प्रदर्शित झाल्यानंतर जवळपास दोन महिन्यांनी आता हा चित्रपट ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
अनुराग सिंग यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात सनी देओल यांच्यासोबत वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी हेही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसतात. ‘बॉर्डर 2’मध्ये सनी देओल यांच्यासोबतच या सर्व कलाकारांच्या अभिनयाचेही मोठे कौतुक झाले. आता हा चित्रपट तुम्ही घरबसल्या ओटीटीवर पाहू शकता.
या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची तारीखही निश्चित झाली आहे. 20 मार्चपासून हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे आता ओटीटीवर हा चित्रपट कशी कमाल दाखवतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा