Dhurandhar 2 :१९ मार्चला रिलीज होतोय ‘धुरंधर २’ चित्रपट; आतापर्यंत किती तिकीट विकले?


ब्युरो टीम : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग यांचा ‘धुरंधर २’ हा चित्रपट १९ मार्च रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे. आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग १४ मार्चपासून सुरू झाली असून चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमध्येच कोट्यवधी रुपयांची कमाई करत दमदार सुरुवात केली आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी कमाईच्या बाबतीत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठी लाट निर्माण करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. चला जाणून घेऊया, अॅडव्हान्स बुकिंगमध्ये ‘धुरंधर २’ची किती तिकीट विकली गेली आहेत.

चित्रपटविषयक वेबसाईट सॅकनिल्कच्या माहितीनुसार, रविवारी (१५ मार्च) सकाळी ७ वाजेपर्यंत ‘धुरंधर २’ या चित्रपटाची १ लाख ५१ हजार ५७७ तिकीट विकली गेली आहेत. ही तिकीट रिलीजच्या पहिल्या दिवसासाठी बुक झाली आहेत. यामधून या चित्रपटाने आतापर्यंत ७.७९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तसेच ब्लॉक सीटचा समावेश केल्यास कमाईचा हा आकडा १५.७३ कोटी रुपयांपर्यंत पोहोचतो.

फक्त एका दिवसातच अॅडव्हान्स बुकिंगमध्ये रणवीर सिंग यांच्या या चित्रपटाने दमदार कामगिरी केली आहे. चित्रपट रिलीज होण्यासाठी अजून चार दिवस बाकी असतानाच दीड लाखांहून अधिक तिकीट विकली गेली आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत तिकीट विक्रीच्या आकड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बंपर ओपनिंग करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने