ब्युरो टीम : कोलकाता नाइट रायडर्स संघाने आयपीएल २०२६ हंगामापूर्वी आपली नवी जर्सी लॉन्च केली आहे. १४ मार्च रोजी जाहीर करण्यात आलेल्या या जर्सीत पुन्हा एकदा चमकदार सोनेरी पॅच दिसणार आहेत. खांद्यांवर आणि बाह्यांवर हे पॅच असतील. जर्सीचा रंग मात्र नेहमीप्रमाणे जांभळाच ठेवण्यात आला आहे. कोलकाता नाइट रायडर्स हा आयपीएलच्या इतिहासातील तिसरा सर्वात यशस्वी संघ मानला जातो. या संघाने तीन वेळा विजेतेपद पटकावले आहे. २०१२ आणि २०१४ मध्ये गौतम गंभीर यांच्या नेतृत्वाखाली तर २०२४ मध्ये श्रेयस अय्यर यांच्या नेतृत्वाखाली संघाने किताब जिंकला. २०२१ मध्ये मात्र या संघाला अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.
More than just a jersey. These are our #LinesOfLegacy 💜 pic.twitter.com/TsixHWnjtX
— KolkataKnightRiders (@KKRiders) March 14, 2026
कोलकाता संघाने आयपीएल २०२५ मध्ये अजिंक्य रहाणे यांच्या नेतृत्वाखाली खेळ केला होता. मात्र त्या हंगामात संघाला साखळी फेरीपुढे जाता आले नाही. गुणतालिकेत संघ आठव्या स्थानावर राहिला होता.
कोलकाता नाइट रायडर्सचा आयपीएल २०२६ मधील पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध २९ मार्च रोजी होणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे. कोलकाताचा पहिला घरचा सामना २ एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध ठेवण्यात आला आहे. सध्या आयपीएल २०२६ मधील केवळ पहिल्या २० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून उर्वरित ५४ सामन्यांचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा