ब्युरो टीम : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६पूर्वी आरसीबीचे फलंदाजी प्रशिक्षक दिनेश कार्तिक यांनी आपली पसंतीची ‘आरसीबी ऑल-टाइम इलेव्हन’ निवडली आहे. कार्तिक यांच्या या संघावर २०२५ मधील ऐतिहासिक विजेतेपदाचा स्पष्ट प्रभाव दिसून येतो. त्यांनी जुन्या दिग्गज खेळाडूंऐवजी सध्याच्या विजेत्या संघातील खेळाडूंना आपल्या संघात स्थान दिले आहे. या संघातील सर्वात धक्कादायक निर्णय कर्णधारपदाबाबत घेण्यात आला आहे. कार्तिक यांनी आपल्या संघाचा कर्णधार विराट कोहली यांना न बनवता रजत पाटीदार यांच्याकडे ही जबाबदारी दिली आहे.
क्रिकबजला दिलेल्या मुलाखतीत दिनेश कार्तिक म्हणाले, “विराट कोहली यांनी अनेक हंगाम संघाचे नेतृत्व केले आणि यशही मिळवले. मात्र माझ्या संघाचा कर्णधार रजत पाटीदार असेल. विजेतेपद मिळवून देणारे ते आरसीबीचे सर्वात यशस्वी कर्णधार आहेत आणि फलंदाज म्हणूनही त्यांनी कमी कालावधीत जेवढा प्रभाव निर्माण केला आहे, तो खरोखरच उल्लेखनीय आहे.”
दिनेश कार्तिक यांची ऑल-टाइम आरसीबी ११ :
क्रिस गेल, फाफ डु प्लेसिस, विराट कोहली, रजत पाटीदार (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), क्रुणाल पांड्या, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल, जोश हेजलवुड.

टिप्पणी पोस्ट करा