Education : डॉ. हेडगेवार शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा बी. एड. दीक्षांत समारंभ उत्साहात


ब्युरो टीम : विद्या प्रतिष्ठान (महाराष्ट्र) संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय, अहिल्यानगर येथे ६१ वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व बी. एड. दीक्षांत समारंभ मोठ्या उत्साहात आणि शैक्षणिक वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठानचे अध्यक्ष दादाराम एकनाथ ढवाण होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून कोषाध्यक्ष प्राचार्य प्रा. डॉ. रावसाहेब आर.पवार यांनी हजेरी लावली. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने मान्यवरांच्या शुभहस्ते झाली. त्यानंतर प्राचार्य प्रा. डॉ. अमरनाथ शांताराम कुमावत यांनी प्रास्ताविकातून महाविद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेत उपस्थितांचे स्वागत केले.

परीक्षा विभाग प्रमुख उपप्राचार्य प्रा. डॉ. गोकुळदास दत्तात्रय लोखंडे यांनी अध्यक्ष व कोषाध्यक्षांचा परिचय करून दिला. दीक्षाविधी महाविद्यालयीन प्रमुख, प्रा. डॉ. शर्मिला भाऊसाहेब पारधे - देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल बी. एड. प्रथम वर्ष विद्यार्थी शिक्षिका धनश्री अवसरे व विद्यार्थी शिक्षक अथर्व काळे यांनी सादर केला. पीएच.डी. प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव प्रा. डॉ. अविनाश ओंकारराव भांडारकर यांच्या निवेदनातून करण्यात आला. तसेच, आर्थिक साक्षरता कोर्सबाबतची माहिती आर्थिक साक्षरता विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रदीप आबासाहेब शेळके यांनी दिली.

पारितोषिक वितरण सोहळ्यात बी.एड. क्रीडा, बी.एड. सांस्कृतिक तसेच, एम.एड. शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे निवेदन कमवा आणि शिका विभाग प्रमुख प्रा. विलास देवराव पांढरे यांनी केले.

मनोगत सत्रात प्रा. डॉ. अविनाश ओंकारराव भांडारकर यांनी प्राध्यापक प्रतिनिधी म्हणून विचार मांडले. विद्यार्थ्यांच्या वतीने बी. एड. द्वितीय वर्ष विद्यार्थी शिक्षिका साक्षी लोंढे, निकिता मोकाटे , ईशा साळवे व सोनाली दारुंटे यांनी तर महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षक प्रतिनिधी कुलदीप कुलकर्णी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रमुख अतिथी मा. प्रा. डॉ. रावसाहेब आर. पवार यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना भविष्यकालीन आव्हानांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात दादाराम एकनाथ ढवाण यांनी शिक्षणातील गुणवत्ता, मूल्याधिष्ठित शिक्षण आणि संशोधनाचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाच्या शेवटी परीक्षा विभाग प्रमुख उपप्राचार्य डॉ. गोकुळदास दत्तात्रय लोखंडे यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी ग्रंथपाल प्रा. रुपाली विक्रांत ओक, एम. एड. विभाग प्रमुख प्रा. डॉ. आश्लेषा अविनाश भांडारकर, प्रा. डॉ. दादासाहेब रंगनाथ काजळे, प्रा. मनिषा देवराम वर्पे - सहाणे, प्रा. अनिता सतीश लवांडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख, प्रा. विशाल रमाकांत जाधव, प्रा. सुनील बाबासाहेब वाकचौरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रतिनिधी मंजुषा बोरुडे (बी. एड. द्वितीय वर्ष) व कल्याणी चौधरी (बी. एड. प्रथम वर्ष) तसेच शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. एड. प्रथम वर्ष विद्यार्थी शिक्षिका रुद्राक्षे शितल व साक्षी शिंदे यांनी प्रभावीपणे पार पाडले. 

हा समारंभ विद्यार्थी शिक्षक व शिक्षिका यांचेसाठी प्रेरणादायी ठरला असून शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्टतेचा गौरव करणारा सोहळा म्हणून ओळखला गेला.

हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी बी. एड. प्रथम वर्ष विद्यार्थी शिक्षक व शिक्षिका तसेच, शिक्षकेतर कर्मचारी यांनी नियोजनबद्ध सहकार्य केले.  

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने