विक्रम बनकर, अहिल्यानगर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीया सणानिमित्त अहिल्यानगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपतीला आज ११ हजार १११ आंब्यांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला.
विशाल गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीने अनेक वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असून, यंदाही मोठ्या भक्तिभावाने हा सोहळा पार पडला. मंदिर परिसरात यावेळी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सणाच्या दुसऱ्या दिवशी या आंब्यांचा महाप्रसाद म्हणून शहरातील विविध घटकांमध्ये वितरण केले जाते. यामध्ये गरजू नागरिक, अंध व अपंग आश्रम, शाळा, तसेच वृद्धाश्रमांचा समावेश असतो.
याबाबत माहिती देताना देवस्थानचे उपाध्यक्ष पंडित खरपुडे यांनी सांगितले की, “समाजातील सर्व घटकांपर्यंत प्रसाद पोहोचावा, या हेतूने हा उपक्रम राबविला जात असून, दरवर्षी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.”
पहा व्हिडिओ

टिप्पणी पोस्ट करा