ब्युरो टीम : भारतीय संगीत क्षेत्रातील 'सूरसम्राज्ञी' आशा भोसले यांचं आज निधन झालं. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आशाताईंची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मुंबईतील प्रसिद्ध ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
आशा भोसले यांना शनिवारी श्वास घेण्यास त्रास आणि प्रचंड थकवा जाणवू लागल्यानं तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं होतं, आज त्यांनी जगाचा निरोप घेतला.आशा भोसले यांच्या निधनानं संपूर्ण संगीतविश्वावर, सिनेइंडस्ट्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला असून, कधीही न भरून होणारी पोकळी निर्माण झाली आहे.
आशा भोसले यांच्यावर उद्या ४ वाजता अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा