PCMC : हरित शपथ उपक्रमातून वसुंधरा संवर्धनासाठी नागरिकांना आवाहन

ब्युरो टीम : वसुंधरेच्या संरक्षण आणि शाश्वत विकासासाठी नागरिकांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने “माझी वसुंधरा अभियान ७.०” अंतर्गत “हरित शपथ” हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून राज्यातील प्रत्येक नागरिकाने वसुंधरेप्रती आपली जबाबदारी ओळखून हरित शपथ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या उपक्रमांतर्गत नागरिकांना “माझी वसुंधरा” या संकेतस्थळावरती जाऊन  https://majhivasundhara.in/en/pledge/MQ%3D%3D वैयक्तिक अथवा सामूहिक स्वरूपात हरित शपथ घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

माझी वसुंधरा अभियान ७.० अंतर्गत घेतलेल्या ई-प्रतिज्ञा तसेच त्यानुसार राबविण्यात आलेल्या वसुंधरापूरक कृतींच्या आधारे वैयक्तिक व सामूहिक स्तरावर गुणांकन करण्यात येणार आहे.

वसुंधरा संवर्धन, वृक्षारोपण, जलसंधारण, स्वच्छतेसाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेणे आवश्यक असून हरित शपथ हा वसुंधरा रक्षणाचा सामूहिक संकल्प असल्याचे उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी सांगितले.

माझी वसुंधरा शपथ

मी भारताचा सुजाण नागरिक शपथ घेतो कि, मी या भारत मातेला, या वसुंधरेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करीन, या वसुंधरेला या पर्यावरणाला माझ्यापासून कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेईन. मी या देशाला सुजलाम-सुफलाम करण्यासाठी कटीबध्द राहील व माझ्याकडून पर्यावरणाला त्रास होईल असे कोणतेही काम मी करणार नाही, जास्तीत जास्त झाडे लावून या देशाला या वसुंधरेला स्वच्छ, सुंदर, हरित आणि प्रदुषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न करेन.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने