Sunetra Pawar Baramati Victory: बारामती पोटनिवडणुकीत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तब्बल २ लाख १४ हजार ९३ मतांनी विजयी


ब्युरो टीम : बारामती पोटनिवडणुकीत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी २ लाख १४ हजार ९३ मतांनी विजय मिळवला आहे. त्यांना २ लाख १८ हजार ९३० मते मिळाली, तर त्यांच्याविरोधात असलेल्या २२ उमेदवार आणि ‘नोटा’ या सर्वांना मिळून ४ हजार ८३७ मते मिळाली.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेत निधनानंतर ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, २२ उमेदवारांनी माघार न घेतल्याने मतदान घ्यावे लागले. या निकालाची औपचारिकता बाकी होती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या अजित पवार यांचा बारामतीतील मताधिक्याचा विक्रम मोडणार का, याकडे सर्वांचे लक्ष होते. अपेक्षेप्रमाणे त्यांनी विक्रमी मताधिक्य मिळविले.

या मतदारसंघात ३ लाख ८४ हजार ५७९ मतदार असून, त्यापैकी २ लाख २४ हजार ८७ मतदारांनी मतदान केले होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने