Ahilyanagar Education : अहिल्यानगर शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा निकाल 100 टक्के



ब्युरो टीम : अहिल्यानगर येथील विद्या प्रतिष्ठान (महाराष्ट्र) नगर केंद्राच्या प. पू. डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठान शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा बी. एड. द्वितीय वर्षाचा निकाल १०० टक्के लागला.

नुकत्याच जाहीर झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत बी. एड. द्वितीय वर्षाच्या परीक्षेच्या निकालात शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील सर्वच विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. यामध्ये  ओ ग्रेडमध्ये २७, ए प्लस १५, ए ग्रेडमध्ये १ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

संस्थेचे अध्यक्ष दादाराम ढवाण, कार्यवाह, सोमनाथ दिघे, सहकार्यवाह माजी प्राचार्य, प्रा. डॉ. रवींद्र चोभे, नवनियुक्त प्राचार्य, प्रा. डॉ. शिवाजीराव देसाई, माजी प्राचार्य प्रा. डॉ. अमरनाथ कुमावत, उपप्राचार्य प्रा. डॉ. गोकुळदास लोखंडे, विभाग प्रमुख प्रा. डॉ. शर्मिला पारधे, केंद्र संयोजक / परीक्षा विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रदीप शेळके, प्रा. डॉ. अविनाश भांडारकर, प्रा. डॉ. दादासाहेब काजळे, प्रा. डॉ. आश्लेषा भांडारकर, प्रा. रुपाली ओक, प्रा. विलास पांढरे, प्रा. मनिषा वर्पे, प्रा. सुनील वाकचौरे, प्रा. अनिता लवांडे, प्रा. विशाल जाधव तसेच, शिक्षकेतर कर्मचारी प्रमोद राणा, सतीश लवांडे, दीपक आढाव, तेजस रोकडे, जयवंतराव मुळे, दर्शन राहिंज यांनी सर्व  यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

असे आहेत पहिले पाच यशस्वी विद्यार्थी

  • मंजुषा दीपक बोरुडे - प्रथम क्रमांक
  • वैष्णवी दयानंद इनामदार कलेढोणकर - द्वितीय क्रमांक
  • साक्षी अरविंद लोंढे - तृतीय क्रमांक 
  • ईशा याकोब साळवे - चतुर्थ क्रमांक 
  • अंजली सुहास हराळ -पाचवा क्रमांक

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने