ब्युरो टीम : जुलै महिना सुरू असून राज्यभर मान्सूनचा जोर कायम आहे. अशा परिस्थितीत रेनकोट हा दैनंदिन वापरातील महत्त्वाचा भाग बनला आहे. मात्र, योग्य रेनकोटची निवड केली तर पावसापासून संरक्षण मिळण्याबरोबरच तुमचा स्टायलिश लूकही कायम ठेवता येऊ शकतो.
दररोज कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांसाठी रेनकोट आवश्यक आहे. त्यामुळे रेनकोट खरेदी करताना केवळ किंमत किंवा रंग न पाहता त्याची गुणवत्ता, फिटिंग आणि डिझाइन याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
सध्या बाजारात रिव्हर्सिबल आणि पोंचो स्टाईलचे रेनकोट मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. हे रेनकोट आकर्षक दिसण्यासोबतच वापरण्यासही सोयीचे ठरतात. तसेच फिकट रंगाऐवजी गडद रंगाचा रेनकोट निवडल्यास त्यावर चिखल किंवा घाण कमी दिसते.
रेनकोट खूप लांब नसावा. आपल्या उंचीला आणि शरीरयष्टीला साजेशी लांबी निवडल्यास व्यक्तिमत्त्व अधिक उठून दिसते. तसेच खूप सैल किंवा खूप घट्ट रेनकोट घेण्याऐवजी योग्य फिटिंगचा रेनकोट निवडल्यास तो अधिक आरामदायी आणि आकर्षक वाटतो.
पावसाळ्यात फॅशन आणि सुरक्षितता यांचा समतोल राखायचा असेल, तर दर्जेदार फॅब्रिक, योग्य फिटिंग आणि आपल्या गरजेनुसार डिझाइन असलेला रेनकोट निवडणे हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. योग्य निवड केल्यास पावसापासून संरक्षण मिळेलच, शिवाय तुमचा स्टायलिश लूकही कायम राहील.

टिप्पणी पोस्ट करा