प्रसिद्ध गायक भूपेंद्र सिंह यांचे निधन

ब्युरो टीम : आपल्या अलवार आवाजाने हिंदी चित्रपट संगीतात पार्श्र्वगायक म्हणून अमीट ठसा उमटवणारे प्रसिद्ध गायक भूपेंद्र सिंह यांचे सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास क्रिटी केअर रुग्णालयात निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.

गेली काही वर्षे ते चित्रपट संगीतापासून दूर होते. हिंदी चित्रपट संगीत क्षेत्रात तीन दशकांची कारकिर्द गाजविणारे भूपेंद्र सिंह प्रसिद्धीच्या झगमगाटापासून थोडे अंतर राखून होते, मात्र त्यांच्या नावाचा उल्लेख झाला तरी गझल गायकीशी जवळीक सांगणाऱ्या त्यांच्या आवाजातील लोकप्रिय गाणी रसिकांच्या ओठांवर सहज रुळू लागतात.

किसी नजर को तेरा इंतजार आज भी है, दिल धुंडता है, नाम गुम जायेगा, एक अकेला इस शहर मे, जिंदगी मेरे घर आना ते अगदी अलिकडे सत्या चित्रपटातील बादलों को काट काट कर या गाण्यापर्यंत खास त्यांच्या आवाजातील गाणी अजूनही लोकांच्या मनात घर करून आहेत.

1/Post a Comment/Comments

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने