Amravati : अमरावती शहरात वाहतूक बदल; बडनेऱ्याकडे जाणारा मार्ग महिनाभर बंद

ब्युरो टीम : अमरावती शहर आणि बडनेरा शहराला जोडणाऱ्या जुन्या बायपास मार्गावरील रेल्वे गेटजवळ रेल्वे पुलाचे बांधकाम सुरू आहे. या कामामुळे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी आजपासून पुढील एक महिन्यासाठी या मार्गावर वाहतुकीसाठी प्रवेशबंदी करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त (मुख्यालय) कल्पना बारवकर यांनी याबाबत अधिसूचना जारी केली आहे.

बगीया टी पॉइंट ते अलमास गेट (बडनेरा) या दरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांना १७ एप्रिल ते १७ मे २०२५ पर्यंत प्रवेश बंद राहील.

पर्यायी मार्ग:

  • *यवतमाळकडून येणारी जड वाहने: यवतमाळ वाय पॉइंट मार्गे अकोला वाय पॉइंट - कोंडेश्वर टी पॉइंट -बगीया टी पॉइंट किंवा राममेघे कॉलेज चौक - बगीया टी पॉइंट या मार्गाचा वापर करू शकतील.
  • हलकी प्रवासी वाहने (चारचाकी व दुचाकी):
  • अलमास गेट - नेमाणी गोडाऊन मार्गे अमरावती शहरात प्रवेश करू शकतील.
  • बगीया टी पॉइंट - द प्राईम पार्क - एमआयडीसी रोड मार्गे अमरावती शहरात ये-जा करता येईल.

अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर मोटर वाहन कायदा १९८८ नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल . नागरिकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने