Nashik : आदिवासी विकास विभागांतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम

ब्युरो टीम : शबरी आदिवसी वित्त व विकास महामंडळामार्फत आदिवासी विकास विभागांतर्गत रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण राबविण्यात येत आहे. त्यानुसार इच्छुक प्रशिक्षणार्थींनी  शबरी महामंडळामार्फत एकलव्य कुशल  http//eklavyakushal.in या बेवपोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन नाशिक सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिकचे प्रकल्प अधिकारी अर्पित चौहान यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी 20 प्रशिक्षण संस्थांची निवड केली असून त्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहेत. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात सद्यंस्थितीत 45 प्रशिक्षण केंद्रांवर निवासी/ अनिवासी स्वरूपाचे  विविध कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जात आहेत. या योजनेंतर्गत 18 ते 45 वर्षे वयोगटातील 13 हजार 800 अनुसूचित जमातीच्या युवक- युवतींना विविध रोजगाराभिमुख कौशल्य प्रदान करून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

याबाबत अधिक माहितीसाठी शबरी महामंडळामार्फत टोल फ्री क्रमांक 18002335860 हा उपलब्ध करून देण्यात आला आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने