ब्युरो टीम: मायग्रेन ही समस्या खराब जीवनशैली तसेच हेल्दी आहाराचे सेवन न केल्यामुळे उद्भवते. आपण जे खातो त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो. मायग्रेनच्या समस्येमध्ये तुम्ही घेत असलेल्या आहाराचा खूप मोठा वाटा असतो. मायग्रेन हा एक प्रकारचा डोकेदुखी संबंधी आजार आहे. यामध्ये उलट्या होणे, अस्वस्थ वाटणे, प्रकाश आणि मोठ्या आवाजामुळे संवेदनशीलता यासारखी लक्षणे दिसतात. कधी कधी हे दुखणे इतके वाढते की सहनशक्ती संपते.
ओनलीमाय हेल्थ नुसार, असे काही पदार्थ आहेत जे मायग्रेनला ट्रिगर करतात. त्या पदार्थांपासून दूर राहिल्यास मायग्रेनची समस्या टाळता येऊ शकते. त्यासाठी नेमकी काय काळजी घ्यावी, ते पाहुयात.
- आइस्क्रीम, पॅक केलेले इंस्टेंट फूड्स इत्यादींचे सेवन केल्याने देखील मायग्रेन होऊ शकतो.
- चॉकलेटमध्ये कॅफीन आणि बीटा-फेनिलेथिलामाइन हे दोन्ही मोठ्या प्रमाणात आढळतात, ज्यामुळे डोकेदुखीची समस्या वाढू शकते.
- मोनोसोडियम ग्लुटामेट (MSG) ग्लुटामिक ऍसिड हे एक सोडियमयुक्त मीठ आहे. हे जास्त खाण्यात आल्याने मायग्रेनची समस्या उद्भवू शकते. हे मीठ पॅकिंग फूड्स, चायनीज फूड्स, पॅकिंग सूप इत्यादींमध्ये आढळते.
- मांस, हॅम, हॉट डॉग आणि सॉसेज यांसारख्या पदार्थांमध्ये नायट्रेट्स नावाचे पदार्थ असतात, जे रंग आणि चव वाढवण्याचे काम करतात. हे पदार्थ रक्तामध्ये नायट्रिक ऑक्साईड सोडू शकतात. ज्यामुळे मेंदूतील रक्तवाहिन्या पसरतात ज्यामुळे मायग्रेनचा त्रास होऊ शकतो.
- जर तुम्ही लोणचे, आंबवलेले अन्न आणि मसालेदार पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले तर त्यामुळे मायग्रेनचा त्रास वाढू शकतो. अशा खाद्यपदार्थांमध्ये जास्त प्रमाणात टायरामाइन असू शकते ज्यामुळे मायग्रेनचा त्रास वाढू शकतो.
टिप्पणी पोस्ट करा