ब्युरो टीम : तमन्ना भाटियाची 'ओडेला 2' (Odela 2) ही क्राइम थ्रिलर चित्रपटगृहात आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर चांगलीच धुमाकूळ घालतेय. परंतु, अनेकांना आता 'ओडेला 1' मधील कथानकाबद्दल उत्सुकता लागली आहे. 'ओडेला 1' नेमकं काय होतं? आणि हा चित्रपट तुम्ही कुठे पाहू शकता? चला, जाणून घेऊ.
काय आहे 'ओडेला 1' चे कथानक?
2022 मध्ये प्रदर्शित झालेला 'ओडेला 1' हा एक जबरदस्त क्राइम थ्रिलर आहे. या चित्रपटाची कथा एका छोट्या खेड्यात घडणाऱ्या रहस्यमय घटनांवर आधारित आहे. गावातील नवविवाहित महिलांचा सुहागरात अगोदरच गायब होण्याचा प्रकार सुरू होतो. या महिलांवर अत्याचार करून त्यांचा खून केला जातो. पोलिसांच्या तपासात उघड होतं की, या क्रूर साखळीच्या मागे गावातीलच एक नराधम आहे, जो महिलांना शिकार बनवत आहे.
कथेतील टर्निंग पॉईंट तेव्हा येतो, जेव्हा तो आरोपी एका पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नीला आपलं पुढचं बळी बनवण्याचा प्रयत्न करतो. पुढे काय होतं? त्या आरोपीचं सत्य समोर येतं का? हे जाणून घेण्यासाठी 'ओडेला 1' तुम्हाला पाहावाच लागेल.
'ओडेला 1' कुठे पाहाल?
'ओडेला 1' हा तेलुगु भाषेतील चित्रपट असून तो सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म 'आहा' (Aha) आणि 'एअरटेल एक्स्ट्रीम' (Airtel Xstream) वर उपलब्ध आहे. मात्र, सध्या हिंदी डबिंगमध्ये हा चित्रपट उपलब्ध नाही. तरीही क्राइम थ्रिलरप्रेमींसाठी हा एक मस्ट वॉच चित्रपट आहे. तर, वेळ न घालवता ओटीटीवर हा थरार अनुभवण्यासाठी सज्ज व्हा!
पहा व्हिडिओ : शिर्डीत साईबाबा दर्शन घेतल्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिला भावनिक अभिप्राय
टिप्पणी पोस्ट करा