त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. पत्रकार विक्रम बनकर आणि किरण बनकर यांच्या त्या मातोश्री होत.
छबुबाई बनकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही अटळ धैर्य, संयम आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर संसार उभा केला. आयुष्यभर कुटुंबाच्या सुखासाठी त्यांनी स्वतःच्या इच्छांचा त्याग करत मुलाबाळांना शिक्षण व संस्कार देण्यास प्राधान्य दिले. त्यांना धार्मिक व सामाजिक कार्याची विशेष आवड होती. विविध धार्मिक कार्यक्रम, उत्सव आणि सामाजिक उपक्रमांमध्ये त्या मनापासून सहभागी होत असत. त्यांच्या साध्या, प्रेमळ आणि मनमिळावू स्वभावामुळे परिसरातील अनेकांशी त्यांचे आत्मीय संबंध होते. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा