Raksha Bandhan :रक्षाबंधनात झाडांशी जुळले आपुलकीचे नाते


ब्युरो टीम : रक्षाबंधनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रेणुकानगर, अहिल्यानगर येथे 11 ऑगस्ट 2025 रोजी पर्यावरण जपण्याचा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. “झाडांशी आपुलकीचे नाते” या संकल्पनेखाली शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी उत्साहाने सहभाग घेतला.

भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचे प्रतीक असलेली राखी यावेळी झाडांना बांधून त्यांचे रक्षण करण्याची शपथ घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी झाडांचे संगोपन करण्याचा संकल्प करताना, “झाडांनाही भावना असतात” या भारतीय संस्कृतीतील विचाराची जाणीव करून दिली.

मुख्याध्यापिका संगीता पाठक यांनी, “जसा भाऊ बहिणीचे रक्षण करतो, तसाच प्रत्येकाने झाडे व पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारावी” असा संदेश दिला. तर ज्येष्ठ पदवीधर शिक्षक प्रकाश मेढे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक सुजाता काळे, रंजना बिडे, अश्विनी भोस, पुनम दिवटे, अंजली जाधव, ललित वाकचौरे तसेच पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने