Kolhapur Ambabai Temple :श्री अंबाबाईचे उद्या (दि.14) धार्मिक विधीनंतर दर्शन होणार पूर्ववत

ब्युरो टीम : भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग नवी दिल्ली यांच्या सुचनेनुसार कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी (अंबाबाई) च्या गर्भगृहाची स्वच्छता व इतर सुचनांची पूर्तता, त्यांच्या देखरेखीखाली आज दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी पूर्ण करुन घेण्यात येणार आहे. तर गुरुवार दि. 14 ऑगस्ट 2025 रोजी धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर श्री महालक्ष्मी (अंबाबाई) चे दर्शन पूर्ववत सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर व श्री पूजक यांच्या वतीने देण्यात आली आहे.

श्री. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मूर्ती सुस्थितीत राहणेच्या अनुषंगाने, जिल्हाधिकारी कोल्हापूर तथा प्रशासक देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर यांच्यावतीने मूर्तीची पाहणी करण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण नवी दिल्ली यांना कळविले प्रमाणे त्यांच्याकडून काम सुरु करण्यात आले होते. त्यानुसार सोमवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सायंकाळी उशीरा श्री. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी (अंबाबाई) देवीच्या मूर्तीची पाहणी व संवर्धन प्रक्रीयेचे काम भारतीय पुरातत्व विभागाकडून सुरु करुन ते आज मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी पूर्ण करण्यात येणार आहे.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने