योजनेद्वारे पुढील आजारांवर 5 लाखापर्यंत मोफत उपचार करण्यात येतील.
1. ENT (नाक, कान, घसा)
2. Ophthalmology (नेत्रविकार)
3. Orthopaedic & Polytrauma (अस्थिव्यंग आणि पॉलिट्रॉमा)
4. Burns (भाजणे)
5. Oncology Units (कर्करोग उपचार युनिट्स)
6. Maintenance of Haemodialysis (Nephrology) Units (हिमोडायलिसिस - मूत्रपिंडशास्त्र युनिट्स)
योजनांचा उद्देश
AB PM-JAY : केंद्र सरकारची ही योजना देशभरातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार प्रदान करते. यामध्ये 1 हजार 356 प्रकारच्या गंभीर आजार, शस्त्रक्रिया आणि रुग्णालयात दाखल होण्याच्या खर्चाचा समावेश आहे.
MJPJAY: महाराष्ट्र सरकारची ही योजना राज्यातील पात्र लाभार्थ्यांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार देते. यामध्ये 1 हजार 356 प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि विशेष उपचारांचा समावेश आहे.
पात्रता:- 70 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे सर्व नागरिक, त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती असो वा नसो; पूर्वी AB-PMJAY अंतर्गत असलेल्यांना अतिरिक्त टॉप-अप कव्हर मिळते.
आरोग्य सुरक्षा:- गंभीर आजारांसाठी 5 लाखांपर्यंत मोफत उपचार, कुटुंबातील इतर 70 पेक्षा जास्त सदस्यांसाठी स्वतंत्र कार्ड.

टिप्पणी पोस्ट करा