Health : 'या' जिल्ह्यात 1 ते 31 जानेवारी 2026 दरम्यान व्हॅनद्वारे कॅन्सर तपासणी


ब्युरो टीम:- कॅन्सरचा लवकर शोध लागून वेळेत उपचार मिळावेत, या उद्देशाने रायगड जिल्ह्यात दि.01 जानेवारी ते दि.31 जानेवारी 2026 या कालावधीत  कॅन्सर व्हॅनद्वारे तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी या मोफत कॅन्सर तपासणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निशिकांत पाटील यांनी केले आहे.

उपसंचालक,आरोग्य सेवा ठाणे यांच्या स्तरावरून जिल्ह्यासाठी कॅन्सर व्हॅन उपलब्ध करून देण्यात येणार असून ए. टी.पी.नुसार  थळ,वाघोली, कोर्लई , तळा, दिघी, नेरूळ, पाभरे, कापडे, टोल,वरंध, निजामपूर, साई, धाटाव,रोहा, जांभूळपाडा,आरव, आमटेम, अंजप, कर्जत,वडवळ, होनाड, आजीवली, जासई, पोयंजे या गावामध्ये खालील वैद्यकीय अधिकारी यांच्या माध्यमातून ही मोहीम राबविली जाणार आहे.

या कॅन्सर व्हॅनसोबत एक स्त्रीरोगतज्ज्ञ, एक दंत शल्यचिकित्सक तसेच एक सहाय्यक परिचारिका उपस्थित राहणार असून प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून गावागावातील नागरिकांची कॅन्सर तपासणी करण्यात येणार आहे. एका दिवसात किमान 150 नागरिकांची कॅन्सर तपासणी करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

कॅन्सरसारख्या गंभीर आजाराबाबत जनजागृती होऊन नागरिकांनी वेळेत तपासणी करून घ्यावी तसेच ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचावी हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

या मोहिमेसाठी डॉ. र्किती रंगनाथन, वैद्यकीय अधिकारी जि.रु. अलिबाग, डॉ.श्रेया पाटील, वैद्यकीय अधिकारी जि.रु. अलिबाग, डॉ. ऋ पीकेश कुलकर्णी वैद्यकीय अधिकारी ग्रा.रु. महाड, डॉ. रामदास तारपेवाड वैद्यकीय अधिकारी उप जि..रु. माणगाव, डॉ. कृष्णा सोनावने वैद्यकीय अधिकारी जि.रु. अलिबाग, डॉ. अश्विनी सोनावले वैद्यकीय अधिकारी ग्रा. रु.चौक, डॉ. स्वाती नाईक वैद्यकीय अधिकारी उप जि.रु. पनवेल, डॉ. भानुदास गिरी, वैद्यकीय अधिकारी ग्रा.रु. महाड,  डॉ. नविना ठाकूर, दंतशल्यचिकित्सक, जि. रु अलिबाग, डॉ. झापकर, दंतशल्यचिकित्सक, ग्रा.रु. उरण, डॉ. प्रदयुम्न ठोंबरे दंतशल्यचिकित्सक, ग्रा.रु. महाड, डॉ. ऋतुजा माळी, दंतशल्यचिकित्सक, जि. रु अलिबाग, डॉ. गणेश मेंगाळ, दंतशल्यचिकित्सक, उप जि. रु. कर्जत, डॉ. सायली बेलगे, दंतशल्यचिकित्सक, उप जि.रु. पनवेल, डॉ. शेखर वानखेडे, दंतशल्यचिकित्सक, ग्रा.रु मुरुड, डॉ. अमोल नगराळे, दंतशल्यचिकित्सक, उप जि.रु.पेण, डॉ. राजन यादव, दंतशल्यचिकित्सक, ग्रा.रु. चौक, डॉ. अतुल देशमुख, दंतशल्यचिकित्सक, ग्रा.रु. कशेली, अनिकेत गोसावी, अधिपरिसेवक जि. रु अलिबाग, श्रीमती प्रियंका माने, अधिपरिसेविका जि. रु अलिबाग, श्रीमती र्हषा राऊत, सहाय्यक परिचारीका भाल,श्रीमती प्रणाली माळी, सहाय्यक परिचारीका वाघोली, श्रीमती शिल्पा ठाकुर, सहाय्यक परिचारीका र्कोलई, श्रीमती सिमा बारकुल, सहाय्यक परिचारीका तळा, श्रीमती ज्योती महाडिक, सहाय्यक परिचारीका नेवरुळ, श्रीमती गितांजली पाटील, सहाय्यक परिचारीका पाभरे, श्रीमती लतिका भांगोजी, सहाय्यक परिचारीका दिघी, श्रीमती मनीषा मोरे, सहाय्यक परिचारीका कापडे, श्रीमती अंजली जांधव, सहाय्यक परिचारीका टोल, श्रीमती सुगंधा ढवळे, सहाय्यक परिचारीका वरंध, श्रीमती जयश्री वाघमारे, सहाय्यक परिचारीका निझामपूर ,श्रीमती सविता पेढवी, सहाय्यक परिचारीका साई, श्रीमती अर्पणा मखर, सहाय्यक परिचारीका धाटाव, श्रीमती स्नेहल चांदोरकर, अधीपरिचारीका रोहा, श्रीमती दर्शना पाटील, सहाय्यक परिचारीका जांभूळपाडा, श्रीमती काशी वाघ, सहाय्यक परिचारीका आराव, श्रीमती हर्षदा पाटील, सहाय्यक परिचारीका आमटेम,श्रीमती भावना महाले, सहाय्यक परिचारीका अंजप, श्रीमती ज्योती ओव्हाळ, अधीपरिचारीका कर्जत, श्रीमती सुर्वणा मोरे, सहाय्यक परिचारीका होणंद, श्रीमती अर्चना चव्हाण, सहाय्यक परिचारीका वडखळ, श्रीमती संजना सोनाबने, सहाय्यक परिचारीका अजिवली,श्रीमती अमृता ढाकणे, सहाय्यक परिचारीका पोयंजे,श्रीमती सुप्रिया वाडकर, सहाय्यक परिचारीका,जासई श्रीमती. मोनाली पाटील, अधीपरिचारीका उरण सेवा उपलब्ध राहणार आहे.

याशिवाय अनिकेत गोसावी, श्रीमती प्रियंका माने यांच्यासह जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांतील अधीपरिचारिका व सहाय्यक परिचारिकांचा समावेश या मोहिमेत करण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने