ब्युरो टीम : कॉमेडियन, रिअॅलिटी शोची होस्ट ‘लाफ्टर क्वीन’ भारती सिंगच्या घरी आणखी एका चिमुकल्या सदस्याचं आगमन झालं आहे. भारतीने काल, १९ डिसेंबर २०२५ रोजी एका गोंडस मुलाला जन्म दिला असून ती वयाच्या ४१ व्या वर्षी दुसऱ्यांदा आई झाली आहे. लग्नानंतर आठ वर्षांनी भारती सिंग व तिचा पती हर्ष लिंबाचिया यांनी दुसऱ्या बाळाचं स्वागत केलं.
भारती सिंग व हर्ष लिंबाचिया यांनी २०१७ साली लग्न केलं होतं. त्यांना लक्ष्य नावाचा एक मुलगा आहे. लक्ष्यचा जन्म ३ एप्रिल २०२२ रोजी झाला होता. आता भारतीने दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. सध्या ती रुग्णालयात आहे. लाफ्टर शेफ्समधील कलाकारांनी भारतीला मुलगा झाल्याचं पापाराझींना सांगितलं. तसेच सर्वांना मिठाई वाटली.

टिप्पणी पोस्ट करा