T20 WC 2026: टी-२० वर्ल्डकपसाठी भारताचा १५ सदस्यीय संघ जाहीर, सूर्यकुमार यादव असणार कर्णधार


ब्युरो टीम : आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६  स्पर्धेला येत्या ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरुवात होणार आहे. तर स्पर्धेतील अंतिम सामना ८ मार्चला खेळवला जाणार आहे. या स्पर्धेसाठी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे.

स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या संघातून शुभमन गिलची सुट्टी करण्यात आली असून रिंकू सिंगला पुनरागमन करण्याची संधी देण्यात आली आहे. तसेच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत धावांचा पाऊस पाडणाऱ्या इशान किशनला देखील या संघात दुसरा यष्टीरक्षक म्हणून संधी दिली गेली आहे. 

असा आहे भारतीय संघ 

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर, इशान किशन (यष्टीरक्षक).

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने