ब्युरो टीम : 'धुरंधर’ चित्रपटाला भारतातच नाही तर इतर अनेक देशांत मोठा प्रतिसाद मिळत आहे. आदित्य धर दिग्दर्शित हा चित्रपट सत्य घटनेपासून प्रेरित आहे. या चित्रपटाची कथा, गाणी आणि कलाकारांच्या अभिनयाची सर्व स्तरावर चर्चा सुरू आहे.
बॉक्स ऑफिसवरदेखील हा चित्रपट धुमाकूळ घालत असून कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटाने १५ व्या दिवशी २२.५० कोटींची कमाई केली आहे. यासह चित्रपटाचे एकूण कलेक्शन ४८३ कोटी इतके झाले असून हा सिनेमा लवकरच ५०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणार आहे. तर जगभरात या चित्रपटाने ७०० कोटींची कमाई केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा