ब्युरो टीम :- "गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला" यासारख्या अनेक भजन किर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाद्वारे अज्ञान दूर करुन अंधश्रद्धा आणि अस्वच्छता निर्मूलनासाठी अथांग कार्य करणारे संत गाडगेबाबा हे थोर समाजसुधारक होते असे प्रतिपादन महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास कार्यकारी अभियंता महेश कावळे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे म्हणाले,' संत गाडगेबाबा यांनी गावोगावी जाऊन स्वच्छतेचा प्रचार केला, अंधश्रध्दा निर्मूलनासाठी जनजागृती केली तसेच नागरिकांतील अज्ञान दूर करण्यासाठी किर्तनाच्या माध्यमातून प्रबोधनदेखील केले. स्वच्छतेसाठी आग्रही असणा-या संत गाडगेबाबा यांच्या व्यापक कार्याचा सर्वानी जोपासला पाहिजे तसेच शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांनी योगदान द्यावे.'

टिप्पणी पोस्ट करा