Fresh Ginger : कोणत्या आल्याचे सेवन करणे ठरेल फायदेशीर? वाचा

 

ब्युरो टीम : तुम्ही अनेकदा एखादा पदार्थ बनवताना  कोरडे किंवा ताजे ओले यापैकी एखाद्या आल्याचा नक्कीच वापर केला असेल. पण तुम्हाला माहिती आहे का, कोरडे आलं व ताजे आलं यापैकी कोणते आलं चांगलं आहे?  चला तर याबाबतच आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. 

ताजे आले आणि कोरडे आले या दोघांचा स्वाद वेगळा आहे. शिवाय स्वयंपाकघरात त्यांचा वापरही वेगवेगळा करण्यात येतो. पौष्टिकतेच्या दृष्टीनेही या आल्यांपासून मिळणारे फायदे खूप वेगळे आहेत. ताजे व कोरडे हे आल्याचे दोन्ही प्रकार विविध प्रकारच्या गरजा पूर्ण करतात. स्वयंपाक करताना या दोन्ही आल्यापैकी नेमक्या कोणत्या आल्याची निवड करायची, ही तुम्ही स्वयंपाक करताना कोणता पदार्थ बनवत आहात, त्यावर अवलंबून असते. तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात ताजे आले वापरत असाल किंवा कोरड्या आल्याची पावडर वापरत असाल, पण या दोन्ही आल्याचा तुम्हाला नक्की फायदा मिळतो. चला तर, आज आपण ताजे आले व कोरडे आले यामध्ये नेमका काय फरक आहे, ते जाणून घेऊ.

कोरड्या आल्याची वैशिष्ट्य

कोरड्या आल्याला हिंदीमध्ये ‘सौंथ’ किंवा ‘सोनथ’ नावानं ओळखलं जातं. कोरडे आलं बहुतेकदा पावडर स्वरुपात असते. कोरडे आले बनवताना ताज्या आल्याला वाळवून, निर्जलीकरण करून त्याची बारीक पावडर केली जाते. ही प्रक्रिया त्याच्या चवमध्ये लक्षणीय बदल करते. कोरडे आले एक मसाला म्हणूनही ओळखले जाते. कोरडे आले हे करी पावडर, भोपळा पाई मसाला आणि गरम मसाला यांसारख्या मसाल्यांच्या मिश्रणात एक प्रमुख घटक म्हणून वापरले जाते. ते पदार्थाला एक चांगली चव देते. स्वादिष्ट ग्रेव्हीजपासून ते तंदूरी एपेटायझर्स किंवा अगदी चहापर्यंत कोरडे आले रोजच्या पदार्थ्यांच्या चवीमध्ये खूप बदल घडवून आणतात. कोरड्या आल्यामध्ये उबदार शक्ती असते, त्यामुळेच ते बऱ्याचदा थंड हवामानात किंवा हिवाळा ऋतूत वापरलं जातं. हा मसाला काही विशिष्ट पदार्थांमध्ये देखील जोडला जातो, ज्यामुळे त्या पदार्थात सूक्ष्म उष्णता येते, व जी शरीराला उबदार करण्यास मदत करते. कोरड्या आल्याचा वापर करून आल्याचे लाडू, गुळाची चटणी, विविध प्रकारचे केक असे विविध पदार्थ बनवले जातात.

ताज्या आल्याची वैशिष्ट्य

ताजे आले हे तिखटपणा व किंचित गोड चवीसाठी ओळखले जाते. जगभरातील असंख्य पदार्थांमध्ये ते मूलभूत घटक म्हणून वापरले जाते. बहुमुखी स्वादामुळे ते तीखट आणि गोड अशा दोन्ही पदार्थांमध्ये वापरता येते. ताजे आले मुख्यतः विविध प्रकारचे स्टिर फ्राईज, करी,  सूप आणि मॅरीनेड बनवण्यासाठी वापरले जाते. पदार्थ्याला एक विशिष्ट सुगंध आणि चव यावी, यासाठी त्याचा वापर उपयुक्त आहे.  फक्त स्वयंपाक घरातील विविध पदार्थच नाही, तर ताजे आले चहा, स्मूदी किंवा लेमोनेड्सची चव उत्कृष्ट करण्यास उपयुक्त असते. उबदार आणि मसालेदार पदार्थ्यांची चव आणखी उत्तम करण्यासाठी या आल्याचा वापर करण्यात येतो. ताज्या आल्यापासून जिंजरब्रेड कुकीज, आले हलवा, आले केक, आले लाडू इ. विविध पदार्थ तयार केले जातात. अनेक आशियाई देशांमध्ये ताज्या आल्याचं लोणच देखील करण्यात येतं. जपानमध्‍ये ‘गारी’ या नावानं ते ओळखलं जातं. तर,  भारतात ते ‘आद्रक का आचार’ किंवा ‘आल्याचं लोणचं’ या नावानं ओळखले जाते.

तुम्ही कोरडे आणि ताजे दोन्ही आले सेवन करू शकता. या आल्यामध्ये फरक असला तरी त्याचे आरोग्याच्या दृष्टीनं चांगले फायदे आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने